सुसह्य प्रवास हवा



मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा आज अत्यंत दयनीय व असुरक्षित अवस्थेत आहे. रोजचे अपघात व मृत्यूचे दार बनलेल्या लोकलमधून मुंबईकरांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही परिस्थिती सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. मुंबईतील वाढलेली गर्दी व त्याचा स्वस्त, जलद वाहतुकीसाठी रेल्वेवर पडणारा जीवघेणा ताण लक्षात घेता उपनगरीय लोकल सेवेला पर्यायी मार्ग काढणे अपरिहार्य झाले आहे. बुलेट ट्रेन, सरकते जिने, वाय फाय अशा सुविधा देण्यापेक्षा मुंबईकरांना आज सुसह्य लोकल वाहतुकीची जास्त गरज आहे. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त