मुंबईत क्लस्टर?


मुंबईतील धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. वस्तुतः मुंबईतील धोकादायक इमारतींची मोठी संख्या व त्या कोसळण्याच्या सातत्याने घडत असलेल्या घटना पाहता जुन्या, जीर्ण इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे झाले आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे यापूर्वी नवी मुंबई, ठाणेसारख्या शहरात जुन्या इमारतींचा विकास करण्याचे धोरण यापूर्वी अंमलात आणण्याचा विचार झालेला आहे. मुंबई शहरात दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती व अनधिकृत इमारतींचा त्यात पडलेला भरणा यामुळे पुनर्विकासासाठी इमारती निश्चित करणे जिकिरीचे ठरणार आहे. नवा विकासक शोधणे व सर्व परवानग्या मिळवणे ही प्रक्रियादेखील वेळखाऊ असल्यामुळे तोपर्यंत रहिवाशांना इतर सोयीस्कर ठिकाणी हलवणेदेखील महत्वाचे आहे. त्यामुळे मुंबईत क्लस्टरचा निर्णय जरी घेण्यात आला तरी तो प्रत्यक्षात अंमलात आणणे म्हणावे तितके सोपे नाही. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त