चंद्राची गुपिते उलगडणार



अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचे आंतराष्ट्रीय यश मानले जाते. त्याबद्दल समस्त भारतवासीयांची छाती अभिमानाने भरून आली आहे. सोमवारी हे चांद्रयान अवकाशात झेपावल्यांतर शास्त्रज्ञ व देशवासियांनी मोठा जल्लोष केला. एका आठवड्याच्या विलंबानंतर उड्डाण केलेल्या या चांद्रयानाच्या मोहिमेदरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. येत्या सात सप्टेंबरच्या दरम्यान हे अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चंद्र व पृथ्वी या दोघांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असून सुर्याप्रमाणेच चंद्रांच्या विविध कलांचा पृथ्वीवर मोठा परिणाम वेळोवेळी दिसून येतो. या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, रसायनं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजं दडली आहेत, तिथे पाण्याचा अंश आहे का, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जाणार असल्यामुळे ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील क्रांतीकारक पाऊल आहे असे म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरणार नाही.


 वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त