माध्यमांनी पुढाकार घ्यावा


फेसबुकचा तंबाखू, सिगारेट, मद्य यासारख्या व्यसनी पदार्थांशी संबंधित मजकुरावर बंदी घालण्याचा निर्णय योग्यच आहे. आज बहुतांशी तरुणाई सोशल मीडियावर प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय असून त्यावर टाकल्या जाणाऱ्या संदेशांच्या व जाहिरातींच्या आहारी गेली आहे. काल्पनिकतेचे भडक दर्शन व पाश्चात्य संस्कृतीला फॉलो करणाऱ्या आजच्या पिढीवर कुठेतरी बंधने आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी व्यसन वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या माध्यमांवर नियंत्रण आणावेच लागेल. यासाठी फेसबुक उचलत असलेले पाऊल स्वागतार्हच आहे. तशाच प्रकारचा निर्णय इतर सोशल एप्लिकेशन्सनी तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांनी घेऊन भावी पिढी संस्कारक्षम बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त