प्रशांत भगत आयटी सल्लागार यांची कार्यालयातून एक्झिट




प्रशांत भगत, आयटी सल्लागार, ह्या आणखी एका कर्मचाऱ्याने आज अभियान कार्यालयातून एक्झिट घेतली. सन २०११ पासून कार्यालयातील आयटी सल्लागार या महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रशांत यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या कसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील ऐतिहासिक ई ऑफिस संकल्पनेचा महत्वपूर्ण साक्षीदार म्हणून त्यांची कायम ओळख राहील. आरोग्य विभागात पेपरलेस कामकाज सुरू करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांनतर विभागात विकसित करण्यात आलेली विविध एप्लिकेशन्स, ई टेंडरिंग, व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबसाईट यासारख्या बाबी रुजवण्यात त्यांचा मोलाचा हातभार लागला. एखाद्या राज्यस्तरीय कार्यक्रमात तांत्रिक सहाय्य असो की अधिकाऱ्यांना आयटी सपोर्ट असो सर्वच आघाड्यांवर त्यांनी मन लावून काम केले. अलीकडच्या काळात मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी विभागामार्फत करारबद्ध करण्यात आलेले "महाआयुदान" हे एप्लिकेशन्स त्यांच्या कारकिर्दीतील विभागाची महत्वाची उपलब्धी मानले जाते. मनमिळावू व सहकार्याचा स्वभाव आणि तांत्रिक कौशल्य यामुळे त्यांचे स्थान नेहमीच उजवे राहिले. कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत त्यांची एका महत्वाच्या तांत्रिक पदावर नियुक्ती झाली असल्यामुळे त्यांनी अभियान कार्यालयातून एक्झिट घेतली असली तरी त्यांचे कार्यकाळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम कायमच स्मरणात राहणारे आहेत. त्यांच्या जाण्याने केवळ एक कर्मचारीच नव्हे तर चांगला कार्यालयीन सहकारी व मित्र दुरावल्याची माझी भावना आहे. त्यांच्यासोबत निर्माण झालेले ऋणानुबंध कायम ठेवण्याचे ठरवून आज सवयीप्रमाणे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "तेजस्वी तारे" हे पुस्तक भेट देऊन निरोप दिला. (सोबत सहसंचालक मा डॉ विजय कँदेवाड सर, श्री विजयराज भोसले व इतर सहकारी). कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांचे कौशल्य, महानगरपालिकेस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गरुडझेप घेणारे ठरवेल अशी आशा आहे. त्यांची पुढील कारकीर्द यशस्वी, निरोगी व लोकोपयोगी ठरो अशी कामना व्यक्त करून त्यांचेसाठी शुभेच्छा चित्तींतो.
धन्यवाद

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त