केंद्र सरकारचा स्वागतार्ह निर्णय


देशातील बहुतांशी व्यवहारांमध्ये आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. बँकांच्या केवायसीमध्येदेखील आधार कार्ड सादर करावे लागते. त्यामुळे बँक व्यवहार साहजिकच आधार कक्षेत आले आहेत. याच पार्श्वभुमीवर आता इन्कम टॅक्‍स रिटर्न्स भरण्‍यासाठी पॅन कार्ड नसले तरी आधार कार्ड वापरता येईल असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. ज्‍यांच्‍याजवळ पॅन कार्ड नाही ते देखील आधार कार्डच्‍या माध्‍यमातून इन्कम टॅक्‍स  रिटर्न्स भरु शकतात. या निर्णयाने करदात्यांना नक्कीच दिलासा मिळणार असून कर भरणे अधिक सोपे व पारदर्शक होईल अशी आशा करण्यास हरकत नाही. आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी पॅनकार्डला आधार कार्डशी जोडणे बंधनकारक असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिला होता. बहुतांशी करदात्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असल्यामुळे आधार कार्डच्या माध्यमातून आयकर भरण्यासाठी कोणत्याही अडचणी उदभवणार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्हच आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त