सेवा आणि वर्तन सुधारा



रिक्षा टॅक्सीवाल्यांची मनमानी आजवर अनेकदा शहरवासीयांनी अनुभवली आहे. जवळच्या किंवा लांबच्या ठराविक ठिकाणांचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन, अनधिकृत रिक्षा, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबणे अशा अनेक तक्रारी रिक्षा टॅक्सी चालकांच्या आहेत. याला सक्षम पर्याय म्हणून ओला, उबेरसारख्या कँपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला ज्यामुळे लोकांना सेवादेखील चांगली मिळू लागली आहे. सुरक्षित, स्वस्त व अपेक्षानुरूप प्रवासामुळे आज शहरि भागातील मोठ्या संख्येने लोक या सेवेचा वापर करू लागले आहेत. या कारणाने येत्या 9 जुलैला रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे. ओला उबेर मुळे रिक्षा चालकांच्या रोजगारावर गदा येऊ लागली असल्याची बाब खरी असली तरी त्यासाठी रिक्षा व टॅक्सीवाल्यांनी आंदोलन न करता आपली सेवा व वर्तन सुधारण्यावर भर दिला तर लोक त्यांच्याकडे पुन्हा वळतील. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त