भक्तीधारा लोकल रेल्वे भजनी ग्रुपचा २६वा वर्धापन सोहळा संपन्न

डोंबिवली येथे पार पडला वर्धापनदिन सोहळा










डोंबिवली - गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून "त्रिमूर्ती सेवा प्रासादिक भजन मंडळ (भक्तिधारा) (लोकल रेल्वे ग्रुप)" डोंबिवली या मंडळाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा दि.११ आॕगस्ट २०१९ रोजी श्री गणेश मंदिर संस्थान, विनायक हॉल, डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न झाला.  मंडळाच्या परंपरेनुसार अध्यात्मिक व सांगितिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध हार्मोनियम वादक गुरुवर्य व भजनरत्न बुवा श्री. सदाशिव महादेव पराडकर, श्री वारकरी भूषण पुरस्कार प्राप्त ह भ प श्री हनुमंत तावरे महाराज, प्रवचनकार ह भ प श्री प्रकाश महाराज कुंभार, ह भ प श्री शामसुंदर सोन्नर   यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात  आला.  गेली २६ वर्षे त्रिमूर्ती सेवा प्रासादिक भजन मंडळासाठी बहुमोल योगदान दिलेले श्री सुरेश करंबेळकर व त्यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा करंबेळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  गुरुस्थानी असलेले श्री  करंबेळकरबुवा यांचे गुरुपूजन करण्यात आले.  या कार्यक्रमात ह भ प प्रकाश महाराज कुंभार यांये प्रवचन व मंडळाच्या सदस्यांकडून दर्जेदार अभंग, भक्तिगीतांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.  या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील कुलकर्णी यांनी केले.  या कार्यक्रमासाठी सर्वश्री बाबी पवार, शिवाजी देसाई, संजय बिडू, विनायक घडशी, अरुण पांचाळ व अन्य सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त