एसटी आली धावून


रस्ते वाहतुकीसाठी लोकांच्या मदतीला आपात परिस्थितीत राज्य परिवहन सेवा म्हणजेच एसटी नेहमीच धावून येत असल्याचे चित्र दिसून येत असते. मुंबई पुणे ही रेल्वेसेवा गेली अनेक दिवस दरड कोसळल्यामुळे व रुळाखालील खडी वाहून गेल्याने बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे मुंबई नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे या काळात प्रचंड हाल होताना दिसत आहेत. खाजगी प्रवाशी वाहतुकीशीवाय अन्य मार्ग या काळात प्रवाशांसमोर उपलब्ध नसल्याने मोठा आर्थिक भार त्यांच्यावर पडत आहे. खाजगी वाहतूकदारदेखील मनमर्जीप्रमाणे भाडे आकारून प्रवाशांची उघड लूट करत आहेत. त्यामुळे एसटीने या काळात बसफेऱ्यांची संख्या वाढवण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. यामुळे एसटी पुन्हा एकदा लोकांच्या मदतीला धावून आली आहे असेच म्हणावे लागेल. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त