ऑनलाईन खटाटोप



आजकालची तरुणाई सातत्याने ऑनलाइन राहण्यात मग्न असून सोशल मीडिया हा त्यांचा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आज मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या सोशल माध्यमांचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. देशातील तरुण मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी तरुणांवर आपले लक्ष केंद्रित करत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी सोशल मिडीयासारखे दुसरे चांगले माध्यम असू शकत नाही. त्यामुळे तरुणाईला आकर्षित करून त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येये, उद्दिष्टे पोहचवण्याचा "ऑनलाईन खटाटोप" येत्या काळात ट्रेंड बनणार एव्हढे नक्की. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त