सामाजिक मदतीची गरज
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांत घरे, व्यवसाय, गुरे, रस्ते, वाहने याबरोबरच पिकांची देखील मोठी हानी झाली आहे. पिकांबरोबरच शेतकऱ्यांची वर्षभराची सुखी संसाराची स्वप्नेदेखील वाहून गेली आहेत. त्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी त्यांना विशेष मदतीची गरज आहे. मुख्यमंत्रांनी जाहीर केलेली एक हेक्टरच्या पिकांसाठीची कर्जमाफी बहुतांशी शेतकऱ्यांसाठी निश्चित उपयोगी ठरेल मात्र त्याचबरोबर त्यांना काही आर्थिक मोबदला दिला गेल्यास त्यांच्या मोडलेल्या संसारासाठी हातभार लागेल. त्यांच्यावर कोसळलेले वर्षभराचे धनधान्याचे संकट पाहता सरकारी मदतीबरोबरच सामाजिक मदतीचीदेखील त्यांना आवश्यकता आहे.

Comments
Post a Comment