सरकरीपेक्षा सामाजिक मदत अधिक
कोल्हापूर सांगलीमध्ये आलेल्या महापुराने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी, व्यापारी यांसह सर्वसामान्य लोकांचे यामध्ये सर्वस्व वाहून गेले आहे. हे नुकसान केवळ सरकारी मदतीने भरून निघणार नाही याची जाणीव असल्यामुळेच महाराष्ट्रभरातून संवेदनशील लोकांच्या, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीचा महापूर या भागात वाहत आहे. झालेले नुकसान व वाताहात समोर दिसत असल्यामुळेच लोक आपापल्या परीने मदत घेऊन या भागाकडे धाव घेत आहेत. या घटनेतून महाराष्ट्राच्या मातीचा सुसंकृत व संवेदनशीलपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. सरकारने धनधान्य, आरोग्य या सर्वच पातळ्यांवर शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र सरकारी मदतीपेक्षा सामाजिक मदतीचा हातभार या भागाचे नुकसान भरून काढण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडत आहे हेदेखील तितकेच खरे आहे.

Comments
Post a Comment