मोदी सरकारची वाटचाल आश्वासक
रिझर्व बँकेने सरकारला 1 लाख 76 हजार 51 कोटी हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता यामुळे केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून कर महसूल आणि खर्चाचा ताळमेळ राखण्यात सरकारला याची मदत होणार आहे. सध्या रिझर्व्ह बॅंकेकडे जवळपास 9.43 लाख कोटींहून अधिक राखीव निधी आहे. या राखीव निधी बाबत पुनर्विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे 2018-19 या वर्षात 1 लाख 23 हजार 414 कोटींचा निधी सरकारला देण्यात येणार आहे. त्याशिवाय 52 हजार 637 कोटींचा अतिरिक्त तरतूद केली जाणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून मिळाणाऱ्या निधीने चालू वर्षातील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी नक्कीच हातभार लागेल व विकासकामांना अधिक गती मिळेल. स्विस बँकेतील काळा पैसा परत मिळवणे गेल्या अनेक वर्षांत कोणत्याही सरकारला जमलेले नाही. आंतराष्ट्रीय आर्थिक धोरणांनुसार तांत्रिक अडचणींची अनेक कारणे त्यासाठी देण्यात येत असली तरी देशाबाहेर गेलेला हा काळा पैसा देशात परत आणून सरकारजमा होणेदेखील आवश्यक आहे. मोदी सरकारची सध्याची वाटचाल त्या दृष्टीने आश्वासक मानली जात असून येत्या काळात नियमबाह्य व्यवहारांना व चुकीच्या मार्गाने कमावल्या जाणाऱ्या उत्पन्नाला चाप बसेल अशी आशा करण्यास हरकत नाही.

Comments
Post a Comment