रुग्णसेवा वेठीस नको


विद्यावेतनात वाढ, नियमित वेतन, क्षयरोग व प्रसूती काळातील प्रलंबित वेतन या मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. आज बहुतांशी सरकारी रुग्णालयांचा गाडा हे निवासी डॉक्टर हाकत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यांच्या कामबंद आंदोलनाने रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. वैद्यकीय सेवा बजावत असताना त्यांना मिळणारे वेतन नियमित मिळणे हा त्यांचा अधिकारच आहे कारण प्रापंचिक दृष्टीकोनातून या डॉक्टरांकडे निवासी सेवेशिवाय अन्य मार्ग उपलब्ध नाही. याबाबत सरकारने तोडगा काढून त्यांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी देखील वारंवार संपाचे हत्यार उपसून रुग्णसेवेला बाधा आणण्याऐवजी अन्य मार्ग अवलंबावेत असे वाटते. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त