जनतेला फायदा होईल


एसटी सेवा असो की बेस्ट बस सेवा, लोकांच्या या परिवहन सेवांकडून फार मोजक्या अपेक्षा असतात. चांगल्या सुविधा, जादा फेऱ्या व माफक तिकिटदर या सेवा प्रवाशांना मिळायला हव्यात. मात्र गेल्या काही वर्षांत नादुरुस्त बसेस व तिकीटदरातील वाढ यामुळे प्रवाशी खाजगी वाहतुकीसारख्या पर्यायांकडे वळू लागले आहेत. यावर बेस्ट ने अंमलात आणलेला स्वस्त तिकिटांचा उपाय बऱ्यापैकी लागू पडलेला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे एसटीच्या शिवनेरी सेवेला देखील मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने व एसटी ने नव्या बसेस आणण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने आनंददायी आहे. यामुळे बसेसची संख्या वाढेल आणि विविध मार्गांवर फेऱ्यांची संख्यादेखील वाढेल अशी आशा आहे. ग्रामीण आणि शहरी ता दोन्ही भागातील जनतेला याचा निश्चित फायदा होईल. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त