डॉ बाळासाहेब सोनवणे प्रतिनियुक्तीवर नवी मुंबईत







*डॉ बाळासाहेब सोनवणे,* सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा यांची प्रतिनियुक्तीने बदली नवी मुंबई महानगरपालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी या पदावर झाल्याने आज कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यमुक्त झाले. ठाणे आणि अमरावती सारख्या महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ सोनवणे यांची काही महिन्यांपूर्वीच बदली आरोग्य भवन मध्ये सहाय्यक संचालक पदावर झाली होती. आरोग्य विभागातील नियोजन, विकास व मूल्यमापन या विषयांचा कार्यभार त्यांचेकडे सोपवण्यात आलेला होता. त्यांना मिळालेल्या अगदी कमी कालखंडात त्यांनी आपल्या जबाबदारीला न्याय दिला असे म्हटल्यास ते वावगे नाही. आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी व सहसंचालक डॉ विजय कंदेवाड सरांनी डॉ सोनवणे यांना कार्यमुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी अगदी आवर्जून आणलेला पुष्पगुच्छ, सह-अधिकाऱ्यांसह देऊन त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या, हेच डॉ सोनवणे यांचे कार्यालयीन कामगिरीचे यश म्हणावे लागेल. सदैव हसतमुख, इतरांप्रती सहकार्याची भावना व कर्तव्यतत्पर असणाऱ्या डॉ सोनवणे सरांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायक राहील. ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणूनदेखील त्यांची कारकीर्द खूपच यशस्वी राहिल्याचे त्यांच्यासोबत काम केलेल्या कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळते. असो, नवी मुंबईसारख्या हायटेक व एकविसाव्या शतकातील स्मार्ट सिटीमध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणे त्यांच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक राहील. कौटुंबिक व व्यक्तिगत अडचणींमुळे त्यांनी प्रतिनियुक्ती घेतली असल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी साधारणतः वर्षभराच्या प्रतिनियुक्ती काळात आपल्या कार्यानुभवाने नवी मुंबईस आरोग्य सेवेत ते एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील अशी आशा आहे. त्यांच्यासारख्या आरोग्य अधिकाऱ्याची सार्वजनिक आरोग्य सेवेला प्रकर्षाने आवश्यकता असल्यामुळे प्रतिनियुक्ती काळ संपवून ते पुन्हा आरोग्य सेवेत परततील हा विश्वास आहेच. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य राहील या अपेक्षेसह त्यांना आणखी एका नव्या इनींगसाठी शुभेच्छा चित्तींतो.
धन्यवाद
वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त