कधी लागणार आचारसंहिता?



विधानसभेचा कार्यकाळ संपण्याआधी नवे सरकार नियुक्त होणे अपेक्षित आहे. या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणूकीबाबत सध्या सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता असून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीचा अनुभव पाहता गणेशोत्सवानंतर म्हणजे 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर आणि 25 ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या दिवाळीपूर्वी मतदान घेतले जाईल अशी शक्यता आहे.  2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. 12 सप्टेंबरला गणेश विसर्जन झाल्यानंतर लगेचच सप्टेंबरच्या दुसर्‍याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. म्हणजेच साधारणतः 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त