वैज्ञानिकांचे मनोधैर्य खच्ची होता कामा नये
इस्रो मध्ये कार्यरत असलेले वैज्ञानिक व इंजिनिअर्स यांच्या वेतनात कपात करणे योग्य नाही. वास्तविकता हे अधिकारी अवकाश संशोधनामध्ये अत्यंत मोलाची भूमिका पार पाडत असतात. आकाशगंगेतील न उकललेल्या अनेक गोष्टींचा शोध त्यांच्यामार्फत लावला गेलेला असल्यामुळे भारताचा आंतराष्ट्रीय बहुमान निश्चित वाढलेला आहे. नुकतीच पार पडलेली चांद्रयान मोहीम असो वा त्यापूर्वीच्या अनेक यशस्वी मोहिमा असो ठरवलेले प्रत्येक लक्ष्य इस्रो ने साध्य केलेले आहे. या कामगिरीत त्यात काम करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांचे योगदान अमूल्य असेच राहिलेले आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या वेतनात कपात न करता त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यापुढील काळात वैज्ञानिक अधिक कार्यक्षमतेने कार्यरत राहण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर होण्यासाठी त्यांचे मनोधैर्य खच्ची होता कामा नये.

Comments
Post a Comment