नैसर्गिक आपत्तीशी लढण्याची जबाबदारी सामूहिक


गेले चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने  सर्वत्र हाहाकार माजवला. सखल भागासह कधीही पाणी न साठणाऱ्या भागातही पाणी साचल्याने लोकांचे मेगाहाल झाले. यात सर्वात जास्त हाल ट्रेन व इतर वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तसेच फिरण्यासाठी विविध ठिकाणी गेलेल्या पर्यटकांचे झाले. जागोजागी तासंतास लोक अडकून पडले होते तर पाण्यात वाहून जाणे, बुडून मृत्यू होणे अशा घटनाही घडल्या. खरेतर अतिवृष्टीशी सामना करण्यासाठी आजही आपल्या यंत्रणा कमी पडत आहेत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही मात्र अशा परिस्थितीत लोकांनीही आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. प्रशासनाकडून धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर प्रवास, पर्यटन टाळणे, जोखमीच्या जागांवर जाण्याचे टाळणे, समुद्र व अधिक पाण्यापासून दूर राहणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. आपत्ती परिस्थितीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची जबाबदारी संवेदनशील लोक, संस्था व जवानांनी व्यवस्थित पार पाडली असल्याचे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्याची जबाबदारी ही सामूहिक असून त्या दृष्टीने प्रशासनाने आणि नागरिकांनीही सतर्क राहायला हवे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त