वारसा १०० वर्षांचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील देवघर हे गाव सार्वजनिक गणेशोत्सवाचे १००वे वर्ष यंदा साजरे करत आहे. गेल्या दोन पिढ्यांचा हा वारसा गावातील तरुण मंडळींनी अविरतपणे आजही सुरू ठेवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कै. महादेव राम पाटील यांनी सुरु केलेला एक गाव एक गणपती उत्सव आजही गावात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदा गावातील हा गणेशोत्सव १०० वर्षे पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने अत्यंत वास्तवदर्शी देखावा साकारण्यात आला असून त्यात गावातील घरे, शाळा, कॉलेज, मंदिरे यांसह गत १०० वर्षांत गावातील ज्या ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला ती ठिकाणेदेखील ठळकपणे दर्शविण्यात आली. गावाशेजारील गुंज काटी येथील डोंगराच्या कुशीत वसलेले भगवान परशुरामांचे पांडवकालीन ऐतिहासिक मंदिरदेखील अत्यंत सुबकपणे देखाव्याच्या दर्शनी भागात दाखवण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. मंदाकिनी पर्वताच्या कुशीत वसलेले १००० ते १२०० लोकवस्तीचे देवघर हे एक छोटेसे गाव असून गावात सर्व सण - उत्सव...
Comments
Post a Comment