ऑनलाईन शॉपिंग मधील धोके




ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करण्यासाठी फेस्टिव्ह सीझन नावाची संकल्पना सध्या दृढ होऊ पाहत आहे. अमेझॉन सारख्या कँपन्यांनी या माध्यमातून देशभरात रोजगार उपलब्ध करून देण्याची केलेली घोषणा नक्कीच चांगली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या हजारो तरुणांना त्यामुळे तात्पुरता का होईना रोजगार मिळणार आहे. मात्र फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाईन सेलमधून वस्तू खरेदी करुन काही ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या असल्यामुळे ह्या फेस्टिव्ह सिझनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सेलमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे व त्याचा मोठा फायदा उत्पादक व ग्राहकांमध्ये मध्यस्थीची भूमिका पार पडणाऱ्या ऑनलाइन कँपन्यांना होत असल्यामुळे फसवणूक झालेल्या मोजक्या ग्राहकांकडे कानाडोळा केला जातो. अनेकदा वस्तू न पोहचणे, खराब वस्तू मिळणे, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा अशा बाबी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगमधील रोजगार हा एक पर्याय असला त्यावरील विश्वासार्हतेबाबतचे धोके ओळखले गेले पाहिजेत. 


वैभव मोहन पाटील 
घवणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त