आरोग्य विभागाची संयुक्त रोग सर्वेक्षण मोहीम
राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये २०२५ पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणा-या अकाली मृत्यूंच्या संख्येमध्ये एकचतुर्थांश इतकी घट करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. तसेच सन २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उददीष्ट ठेवण्यात आले आहे. असंसर्गजन्य आजारांमुळे जवळपास ६३ टक्के मृत्यू होतात. प्रामुख्याने ३५ ते ६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये हे आजार आढळून येत असल्यामुळे देशाच्या विकासावर याचा मोठा परिणाम संभवतो. देशात साधारणतः मधुमेह ६ टक्के, उच्चरक्तदाब १५ टक्के तसे दर 1 लाख लोकसंख्येमागे कर्करोगाचे १०० रुग्ण आढळुन येतात. जिवनशैलीतील बदल, व्यायामाचा व हालचालीचा अभाव, आहारातील बदल, वाढता ताणतणाव, तंबाखू सेवन, धुम्रपान, मदयपान इत्यादी गोष्टींमुळे व्याधींमध्ये वाढ होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये या रोगांचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा आरोग्य विभागाकडूनही वारंवार उपाययोजना व विविध प्रकारच्या मोहीम हाती घेण्यात येत आहेत. मात्र राज्यात आता पहिल्यांदाच कर्करोग, महुमेह, ह्रदयविकार यासारख्या असंसर्गजन्य रोगांसोबत कुष्ठरोग, क्षयरोग याबाबतही सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राज्यात प्रथमच कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्य आजारांसाठी संयुक्त सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. १३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ह्या मोहिमेत एकूण पाच रोगांबाबत घरोघरी रोग प्रतिबंध जागरुकता निर्माण केली जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंतीचे निमित्त साधुन ही महात्वाकांक्षी मोहिम आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली. यात ग्रामीण भागातील १०० टक्के म्हणजे जवळपास ६.२८ कोटी व शहरी भागाची ३० टक्के म्हणजे जवळपास १.८४ कोटी असे एकूण ८.६६ कोटी लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी एकूण ७०,७६८ शोध पथके नेमण्यात आली आहेत. आशा कार्यकर्ती व पुरुष स्वयंसेवक यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे. महिला सदस्याची आशा मार्फत व पुरुष सदस्याची पुरुष स्वयंसेवकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणामध्ये कुष्ठरोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, महिलांमधील स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग या सात आजारांबाबत तपासणी व जनजागृती करण्यात येत आहे. या तपासणीत निदान झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले.
एकूण पाच प्रश्नांद्वारे असंसर्गजन्य आजारांच्या धोक्याचे मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये आपले वय किती?, आपण नियमित व्यसन करता का?, आपण एका आठवड्यात किमान १५० मिनिटे शारीरिक व्यायाम करता काय?, आपण बिडी, सिगरेट, तंबाखूयुक्त गुटखा आदीचे सेवन करता का?, कमरेचे माप, आपल्या परिवारातील कोणी सदस्य उच्च रक्तदाब मधुमेह आणि ह्रदयरोग आजारांनी पीडित आहे का? यासारख्या प्रश्नावलीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला चारपेक्षा जास्त गूण असतील तर त्या व्यक्तीला असंसार्गिक आजार होण्याचा धोका आहे हे ओळखून त्याच्यावर पुढील उपचार नजीकच्या उपकेंद्रात करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत प्रत्येक रोगाची मोहीम वेगवेगळी राबविल्या जात होती. परंतू या वेळी प्रथमच कुष्ठरूग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्य जागरूकता एकत्रित रित्या राबविण्यात आली.
मुंबई भागामध्येदेखील संयुक्त कुष्ठरोग शोध, सक्रिय क्षयरोग शोध आणि असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियानाचे आयोजन २३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. या काळात मुंबईतील झोपडपट्टय़ा आणि त्यासदृश परिसरातील तब्बल ४० लाख नागरिकांची कुष्ठरोग, क्षयरोग यांसह उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग या असंसर्गजन्य रोगांबाबत प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. संशयित रुग्ण आढळल्यास पुढील तपासणीसाठी त्यांना पालिकेच्या दवाखान्यात पाठवण्यात येणार आहे. पालिकेने मुंबईत कुष्ठरोग, क्षयरोग नियंत्रणासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुष्ठरोग, क्षयरोग शोध आणि जागरूकता अभियान हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश असलेल्या तब्बल दोन हजार ७०५ पथकांच्या माध्यमातून हे अभियान मुंबईभर राबविण्यात येत आहे. झोपडपट्टय़ा आणि त्यासदृश वस्त्यांमध्ये जाऊन ही पथके तब्बल ४० लाख व्यक्तींची तपासणी करणार आहे. तपासणी दरम्यान कुष्ठरोग वा क्षयरोग रुग्ण आढळल्यास त्याला उपचारासाठी पालिकेच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. दवाखान्यात कुष्ठरोग, क्षयरोग वा असंसर्गजन्य रोगांचे निदान करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर त्वरित औषधोपचार सुरु करण्यात येणार आहेत.
या संयुक्त मोहिमेची वैशिष्टये -
समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करणे, संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी संशयीत रुग्णांचा शोध घेणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे व कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे, निदानाअभावी औषधोपचारापासून वंचित क्षयरुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार करणे, क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, संशयित क्षयरुग्णांच्या आवश्यक तपासण्या करून क्षयरोगाचे निदान करणे व औषधोपचार सुरू करणे, समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, असंसर्गजन्य रोगांबद्दल जनजागृती करणे, वय वर्षे ३० व अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग, मुख, गर्भाशय व स्तन या रोगांबाबत सर्वेक्षण करणे इत्यादी

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment