स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक




आपल्या देशात स्त्री पुरुष भेदभावाची पूर्वापार चालत परंपरा बऱ्याच अंशी खंडित झाली असली तरी आजही अनेक कुटुंबात मुलगा हाच वंशाचा दिवा समजला जातो. यामुळे देशातील जवळपास सर्वच भागांत थोड्याफार फरकाने लिंग गुणोत्तरामध्ये कमालीची तफावत आढळते. गर्भलिंगनिदानासारख्या समाजाला शाप ठरलेल्या बाबीचा उपयोग स्त्री अर्भकाला गर्भातच संपवण्यात होत असेल ती नक्कीच चिंतनीय गोष्ट आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वत्र आदिशक्तीचा गजर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी महिलांचा आदर करण्याविषयी केलेले वक्तव्य देशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराला वाचा फोडणारे आहे. महिलांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्या समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये समाधान व आंनद देणारी आई, बहीण, पत्नी हवी मात्र मुलगी नको हा दृष्टिकोन बदलण्याची खरी गरज आहे. आज अनेक महिला आपल्या कर्तबगारीच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. मात्र समाजातील दुर्लक्षित व  दुर्बल स्त्रियांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक असून त्यासाठी सरकारबरोबरच सर्व क्षेत्रातील घटकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त