लेतलतीफपणा थाम्बणार



एक्सप्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना तासनिहाय नुकसान भरपाई देण्याचा आयआरसीटीसीचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. रेल्वेच्या लेटलतीफपणामुळे बोटे मोडणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय सुखद धक्का देणारा असला तरी त्यामुळे रेल्वेची विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे गाडीची अचूक वेळ पाळण्यासाठी रेल्वेची जबाबदारी आणखी वाढणार असून त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. रेल्वे क्रॉसिंग, सिग्नल बिघाड, उपनगरीय लोकलच्या वेळा व इतर आपत्तीजनक स्थितीमध्ये वेळेत गाड्या चालवणे जिकिरीचे असतानादेखील रेल्वेने उचललेले हे शिवधनुष्य प्रशंसनीयच आहे. रेल्वे एक तास लेट झाली तर 100 रुपये, दोन तास लेट झाल्यास 250 रुपये प्रवाशांना नुकसानभरपाई मिळणार असली तरी रेल्वे वाहतूक वेळेवर चालवण्यासाठी प्रशासन आटापिटा करणार हाच आनंद प्रवाशांना अधिक सुखावून जाणार आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त