बंडखोरीचा फटका सर्वच राजकीय पक्षांना
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटपानंतर बंडखोरीची लागण बहुतांशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षाकार्याचे काम केल्यानंतर एन निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढण्याची संधी न मिळाल्याने अनेक इच्छुकांच्या संतापाचा कडेलोट होणे स्वाभाविक आहे. त्यात राजकीय अस्तित्व व सत्तेचा उपभोग घेण्यासाठी इतर पक्षातून प्रवेश केलेल्या नेत्यांना पक्षाने तिकिटे जाहीर केल्याने संतापात भरच पडली आहे. या बंडखोरीची सर्वाधिक लागण सेना-भाजप युतीला झल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही बंडखोरी थोपवण्यासाठी पुढाकार घेत इशारा दिला आहे. देशाच्या व राज्याच्या राजकारणात वरिष्ठ स्तरावरून पक्षवाढीला सर्वाधिक महत्व दिले जात असल्यामुळे अधिकाधिक जागा जिंकून याव्यात यासाठी पक्षानिष्ठेपेक्षा हमखास निवडून येणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते. याच सूत्रानुसार भाजपने नव्याने पक्षात दाखल झालेल्या राजकारणातील अनेक रथी महारथीना तिकिटे दिली आहेत ज्यांची निवडणूक जिंकण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत बंडखोरीचा फटका भाजपसाहित सर्वच राजकीय पक्षांना बसणार असला तरी अशा बंडखोरीला मतदानात लोक कोणत्या कलेने घेतात यावर सत्तेची गणिते अवलांबून असणार आहेत.

Comments
Post a Comment