कर्जमाफीची वेळच येऊ नये यासाठी उपाययोजना आवश्यक
निवडणुका आल्या की शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा जोर धरू लागतो. कर्जमाफीसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा फायदा किती व कोणत्या लोकांना झाला हे एकदा सर्वांसमोर यायला हवे. यासाठी गावनिहाय कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांची नावे ऑनलाईन जाहीर करायला हवीत. त्यावर आक्षेप अथवा दुरुस्ती करण्यासाठी त्याच पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी जेणेकरून सर्वांसाठी ही आकडेवारी सहज उपलब्ध होईल. शिवसेनेने सरकारमध्ये असताना कर्जमाफीवरून घेतलेली सरकारविरोधी भूमिका सर्वश्रुत असल्यामुळे नव्या सरकारमध्ये तरी ते आपल्याला न पटलेल्या बाजू सुधारन्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. वास्तविकता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये यासाठी शेतीक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारने आवश्यक उपाययोजना व ठोस नियोजन करायला हवे.

Comments
Post a Comment