आरोग्यदायी जिवनासाठी पुरेशी ''झोप'' आवश्यक
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
आरोग्यदायी जिवनासाठी पुरेशी ''झोप'' आवश्यक
दिवसभरात आपण शारीरीक हालचालीच्या अनेक गोष्टी करत असतो. सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेपर्यंत आपल्या शरीरातील इंद्रिये अविरतपणे काम करत असतात. मात्र दिवसभरात आलेला थकवा दूर करण्यासाठी झोप अत्यंत महत्वाची असते. झोपल्यावर शरीराच्या सर्व क्रिया मंदावतात, अवयवांना आराम मिळतो. नीट झोप झाली नाही तर चिडचिडेपणा, थकवा, अंगदुखीसारखा त्रास होतो. या स्थितीत व्यक्तींची एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांच्या कामात चुका होतात. चुका झाल्याने अनेकदा व्यक्ती अडचणीत सापडतो किंवा अपघातही घडू शकतात. सततच्या अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता बळावते. लहान मुलांना पुरेशी झोप अत्यंत गरजेची असते. त्यांच्या अर्धवट झोपेने त्यांच्यात अनेक शारीरीक विकार उदभवू शकतात. लहान मुलांची झोप नीट न झाल्यामुळे चंचलपणा, अशक्तपणा, बुद्धीचा खुरटलेला विकास असे त्रास संभवतात.
झोपेचे तास हे वयानुसार बदलतात. लहान मूल दिवसा व रात्री अनेक तास झोपते. याउलट वृध्द माणसांची झोप कमी असते. त्यामुळे वयाच्या मानाने पुरेशी शांत झोप मिळणे आवश्यक आहे. दररोज ६ ते ८ तास झोपणे म्हणजे आरोग्याचे एक चांगले लक्षण मानले जाते आणि शांत झोप मिळाल्याने झोपून उठल्यावर प्रसन्नता वाटते.
रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. रात्री जास्त जागणे, दिवसा उशिरा उठणे यामुळे पचनसंस्थेचे चक्र बिघडते. रात्रीचे जेवण उशिरा झाले तर सकाळी जडपणा जाणवतो. संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास हलके जेवण घेऊन लवकर झोपून पहाटे लवकर उठणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. अनेकांना झोपेत स्वप्न पडतात तर काही दचकुन जागे होऊन उठतात. झोपेत स्वप्न पडणे हे नैसर्गिक आहे. पण स्वप्नांमध्ये नेहमी भीती वाटणे, ओरडून उठणे हा त्रास असेल तर त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे
शरीराला आवश्यक असणा-या इतर क्रियांप्रमाणेच झोप हीदेखील एक क्रिया आहे. मानेच्या भागातील पेशींमध्ये झोपेचे संकेत निर्माण होतात. तेथून मज्जारज्जूद्वारे शरीरातील सर्व अवयवांना मंदावण्याचे संकेत जातात. मेंदूच्या इतर भागांनाही हे संकेत जातात. त्यानंतर डोळ्यांची बुब्बुळे हलतात. या दरम्यान मांसपेशीतील ताण वाढतो आणि शरीराच्या काही हालचाली होतात. या झोपेच्या टप्प्यात शरीर आणि अवयव नेहमीपेक्षा जास्त उत्तेजित होतात. हा टप्पा मेंदूच्या आरामासाठी महत्त्वाचा असतो. साधारण दर २५ तासांमागे सहा ते आठ तास झोप प्रौढ व्यक्तीसाठी गरजेची आहे. झोपायला गेल्यावर अर्ध्या तासात शांत झोप लागली तर ते चांगले लक्षण मानले जाते. आणि त्यानंतर जाग आल्यावर आराम वाटला पाहिजे. दिवसभर काम करताना उत्साह जाणवला तर चांगली झोप झाली असे समजले जाते. काही व्यक्ती सूर्यास्ताबरोबर झोपतात आणि सूर्योदयाच्या आधी उठतात तर काही मध्यरात्रीनंतर झोपून सकाळी उशिरा उठतात. काही व्यक्ती दुपारची झोप घेतात. नवजात शिशु दिवसभर झोपत असतो. साधारण तीन ते पाच महिन्यांमध्ये ते रात्री जास्त व दिवसा कमी झोपू लागते. शाळेतील मुलांना सात ते नऊ तास झोप लागते. पौगंडावस्थेत झोपेची गरज आणखीनच वाढते. त्यानंतर प्रौढपणात सहा ते आठ तास झोप पुरते. मेंदूचे आणि मानसिक आजार, शारीरिक आजार आणि परिसरातील गोंधळ यामुळे झोपेच्या तक्रारी उदभवतात. त्यामुळे आपण ब-याचदा झोप चांगली झाली नाही असे म्हणतो. एखादी व्यक्ती पलंगावर डोळे मिटून पडलेली असते म्हणून त्यांना झोपेच्या तक्रारी नसतात, असे म्हणू शकत नाही. ब-याचदा लहान मुलांनाही झोपेच्या तक्रारी उद्भवतात.
झोप कमी किंवा जास्त लागण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषधी किंवा अंमली पदार्थाचा वापर करू नये. झोपेच्या काही तक्रारी असतील तर त्याची कारणे नीट तपासून पाहा. यावेळी वैदयकीय सल्ला घेतलेला उत्तम. प्रकृतीमानानुसार झोपेचे नियोजन सुरुवातीपासुनच करणे योग्य आहे. झोपेचे ठिकाणदेखील शांत, प्रसन्न आणि आरामदायी असले पाहिजे. झोपेच्या एक दोन तास आधी जेवण, उचलठेव, मनाला त्रास होईल असे वाचन वा चर्चा, चहा-कॉफी आणि अंमली पदार्थ टाळा. टीव्हीपासुन किमान तासभर दूर राहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप कधीही लागली तरी विशिष्ट वेळेलाच उठण्याची सवय करा. त्यामुळे चांगली झोप सातत्याने घेण्याचा तुमचा प्रयत्न राहील. झोपेचे आपल्याला होणारे त्रास हे एखादया आजाराचे लक्षण असू शकते त्यामुळे सातत्याने झोप लागत नसेल, झोपमोड होत असेल, झोपेमधुन वारंवार मध्येच जाग येत असेल तर वैदयकीय सल्ला घेणे उत्तम. चांगली झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. त्यामुळे दररोज पुरेशा प्रमाणात झोप घेण्याचा प्रयत्न करा व आरोग्यदायी जिवन जगा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment