कंत्राटी कामगारांचाही विचार व्हावा


राज्याच्या तिजोरीवर हजारो कोटींचा बोजा स्वीकारून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटच म्हणावी लागेल. महाराष्ट्रासह अन्य राज्यात  होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही घोषणा केली असली तरी त्याचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे. लवकरच ही वाढ विविध राज्यांतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीदेखील लागू होण्याची शक्यता आहे. मात्र  केंद्र शासनाच्या विविध योजना व आस्थापनांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी  व मानधन तत्वावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील सरकारने काही प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्र्यांच्या अनेक योजनांमध्ये राबणारे मानधन तत्त्वावरील कर्मचारी अथक मेहनतीने सरकारी सेवा लोकांपर्यत पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन व सरकारी योजनांच्या यशस्वीतेतील त्यांचे योगदान पाहता नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने मानधनवाढीसाठी त्यांचादेखील विचार होणे गरजेचे आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 
 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त