शेतकरी उध्दव होण्याच्या मार्गावर



राज्यात सर्वत्र पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतजमिनीची परिस्थिती हृदयद्रावक अशीच आहे. मोठ्या कष्टाने मशागत केलेले उभे पीक डोळ्यांसमोर नष्ट होत असताना शेतकऱ्याची परिस्थिती काय होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. आधी कोरडा दुष्काळ व आता ओला दुष्काळाने शेतीची पार वाताहत झालेली असून येत्या काळात शेतमालाची परिस्थिती महाराष्ट्रात गंभीर असणार आहे. शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्याला मोठ्या अपेक्षा आहेत. नवे सरकार बनवण्यात येत असलेले राजकीय अडथळे पाहता राज्याचे पालक म्हणून राज्यपालांनी आता शासनाची धुरा हाती घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त