बदलत्या वातावरणाने आजारांत वाढ
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
बदलत्या वातावरणाने आजारांत वाढ
ऑक्टोबर महिना संपला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीय. अवकाळी सुरु असलेल्या पावसाने लोकांचे दैनंदिन जिवन अस्वस्थ करुन टाकले आहे. ग्रामीण भागांत तर शेतीची पार वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या सातत्याने बरसणा-या हया बेमोसमी पावसाने विविध आजार डोके वर काढू लागले आहेत. रुग्णालयांमधील रुग्णांची वाढती गर्दीवरुन बदलते वातावरण आरोग्याला अपायकारक ठरत असल्याचे लक्षात येत आहे. एकीकडे लांबणीवर परतीचा पाऊस आणि त्यातच ऑक्टोबर हीटचे चटके अशा संमिश्र वातावरणाचा फटका लोकांना बसत आहे. संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले असून सर्दी, खोकला यांसह तापाची लागण झाल्याने मागील महिनाभरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसते. नवरात्रापाठोपाठ दिवाळीच्या सणापर्यंत आपला मुक्काम कायम ठोकणाऱ्या पावसाने यंदा महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले. जुलै महिन्यापासून पावसाचा वाढलेला जोर ऑक्टोबर महिन्यातही कायम होता. ऑगस्ट महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवापासून पुन्हा एकदा हजेरी लावली असून दिवाळीपूर्वी अवघे काही दिवस पावसाचा तडाखा कायम होता. मात्र त्याचवेळी तापमानातही वाढ झाली असताना ऑक्टोबर हीटचा चटकाही जाणवू लागल्याचे दिसते. मिश्र वातावरणामुळे हवेत झालेल्या बदलाचा फटका आरोग्याला बसत असून थंडीमुळे घसादुखी, खोकला, सर्दी या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. तापाचा विळखाही सध्या जाणवत आहे. मात्र या तापाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याची साथ वाढत आहे. घसा आणि कान दुखण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. थंडीमुळे होणारी सर्दी नेहमीची असली तरी घश्यातील इन्फेक्शन तसेच कानातील स्नायू गोठण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील आजाराच्या प्रमाणाच्या तुलनेने हे प्रमाण अधिक आहे. बालरुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. हिवाळ्यात हिवताप हा आजारही सतत भेडसावत असतो. वातावरण बदलामुळे डासांची संख्या वाढल्याने हिवतापाचे रुग्ण वाढतात. हिवाळ्यात हवा कोरडी असल्यामुळे हवेमध्ये धूळ अधिक प्रमाणात असते. या धुळीमुळे श्वसनाचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. यामध्ये मुख्यत: दम्याच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे उष्ण वातावरणातून थंड वातावरणात संक्रमिक होणाच्या काळात दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. थंड हवेशी संपर्क आल्यामुळे किंवा अगदी थंड पाणी प्यायल्यामुळे वा सकाळी बागेत फिरणे, थंड पाण्यात आंघोळ करणे अशा कारणांमुळेही दम्याचा झटका येऊ शकतो. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात सर्दीसारखे आजार होऊ नये यासाठीही काळजी घ्यायली हवी. मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांनीही थंड हवेत फिरणे किंवा थंड पदार्थ खाणे टाळलेले बरे. या काळात वयोवृद्धांना होणारे पाठ, पाय दुखणे असे त्रास वाढतात. बदलत्या वातावरणाचा परिणाम वयोवृद्ध मंडळी आणि लहान मुलांमध्ये अधिक दिसतो. त्यामुळे याबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे फटाक्यांमुळेही होणा-या वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवतात, तर दमा, क्षयरोग किंवा मूत्रपिंडाच्या रुग्णांचाही आजार बळावण्याची शक्यता असते.
काही दिवसांपासून पावसामुळे हवेत थंडावा असला तरी आता उन्हाचे प्रमाणही वाढत आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे असुन आहारातही बदल केले गेले पाहिजेत. हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे किंवा थंड हवेत फिरायला जाण्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार बळावतात. यासाठी गरम पाणी पिणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे हितावह आहे. हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करू नये, त्याऐवजी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करावा. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर व नाकावर रुमाल धरावा. नाकातील स्रावातून निघणारे विषाणू हवेत पसरतात आणि त्यामुळे आजाराचा संसर्ग वाढतो. सर्दी किंवा खोकला झालेल्या रुग्णाचा हातरुमाल कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरू नये. डासांपासून बचाव करण्यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणे फायदेशीर आहे. सर्दी, खोकला या आजारांचा संसर्ग होऊ नये यासाठी वारंवार हात धुणे गरजेचे आहे. दम्याच्या रुग्णांनी कमी तापमानात जाणे टाळावे. घराबाहेर पडल्यावर नाकावर रुमाल किंवा स्कार्फ बांधावा. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आजाराची वैद्यकीय माहिती स्वत:सोबत ठेवावी. यामुळे अवेळी आजार उद्भवल्यास इतरांना त्याची माहिती मिळेल व लवकर उपचार करणे सुकर होईल. बदलत्या वातावरणात कोणत्याही आजार वा संसर्गाविना तग धरुन राहणे महत्वाचे असुन त्यासाठी आवश्यक काळजी सर्वांनी घ्यायला हवी. आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास वैदयकीय उपचार घ्यावेत. आपल्याला जडलेला आजार बळावू नये व संक्रमित होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्ष राहायला हवे.
प्रतिबंधात्मक काळजी हाच सर्वात मोठा उपचार
वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment