सत्तेचा गुंता आपसात सोडवावा


सत्तास्थापनेचा अधिकार व कौल महाराष्ट्रातील जनतेने मतदानाद्वारे राजकीय पक्षांना दिलेला आहे. त्यांनीच पुढाकार घेऊन एकमेकांच्या साथीने स्थिर सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राज्यपालांची भेट घेऊन काही नेतेमंडळी सत्तास्थानेचा गुंता सोडवण्याची मागणी करत आहेत. हे म्हणजे घरातील भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थ किंवा त्रयस्थाचा आधार घेण्यासारखे आहे. सत्तास्थापनेची बाब ही कालमर्यादीत आहे. त्यामुळे विशिष्ट काळात सत्तास्थानेसाठी बहुमताद्वारे जास्त लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या राजकीय पक्षाने सत्तेवर हक्क सांगून बहुमत सिद्ध करायला हवे. त्यासाठी राज्यपालांसारख्या राज्यातील सर्वोच्च पदास गाऱ्हाणे घालणे कितपत योग्य आहे? विहित मुदतीत कोणताही राजकीय पक्ष बहुमत सिद्ध करू शकला नाही तर अशा परिस्थितीत राज्यपाल हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सत्तास्थापनेचा निर्माण झालेला गुंता राजकीय पक्षांनी लवकरात लवकर आपसांत सोडवून राज्यातील जनतेला नवे व स्थिर सरकार द्यावे ही अपेक्षा.









वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त