नुकसानभरपाई वाढवून द्यावी
राज्यपालांनी अडीच एकराला आठ हजार नुकसान भरपाईची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. पीक लागवडीपासून ते हातात येईपर्यंत शेतकऱ्याचा खर्च आज अवाक्याबाहेरचा आहे. बियाणे, खते, नांगरणी, पेरणी, कापणी, झोडपणी यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व खर्च लागतो. तो भागवण्यासाठी शेतकरी कुठूनतरी उसनवारी किंवा कर्ज काढतो. अडीच एकर साठी येणारा खर्च आठ हजारात कुठल्या हिशोबात बसवला गेलाय हे अनाकलनीय आहे. संपूर्ण पीक हंगामात यासाठी शेतकऱ्याचा खर्च खूप मोठा आहे. नुकसान भरपाई व पीकविमा मिळून त्याला किमान पंचवीस ते तीस हजार हेक्टरी मिळायला हवेत. सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकरी या मदतीत समाविष्ट व्हावेत यासाठी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय रास्त असला तरी हेक्टरी मदत वाढवून देण्याबाबत विचार व्हायला हवा.

Comments
Post a Comment