राज्यात नव्या सत्तासमिकरणांची चर्चा
सध्या राज्यात यावरून निर्माण झालेला पेच महाराष्ट्राला नवा नाही. मतदानामध्ये संमिश्र कौल मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या अडचणी नेहमीच येत असतात. सत्तेसाठी राजकीय पक्षांची एकमेकांवर कुरघोड, आरोप प्रत्यारोप, मागण्या या बाबी सदासर्वदा घडत असतात. सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र लढलेले भाजप शिवसेना हे पक्ष सत्तेसाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी सत्तेची गणिते जुळवून आणण्यात दोन्ही पक्षांना कमालीची कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्री ह्या सर्वोच्च पदावरून सुरू असलेला हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल या निष्कर्षापर्यंत काही नेतेमंडळी पोहोचली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्यावर केंद्र सरकारचा पर्यायाने भाजप सरकारचाच वरचष्मा राहणार असल्यामुळे ती परिस्थिती भाजपेतर पक्षांना परवडणारी नसेल. त्यामुळे भाजप सेनेने लवकरात लवकर सत्ता स्थापनेसाठी हालचाली न केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष सत्ताकरणात नवी समीकरणे जुळवून आणण्यासाठी सक्रिय होतील एव्हढे नक्की.

Comments
Post a Comment