लहान मुलांचे आरोग्य महत्वाचे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
लहान मुलांचे आरोग्य महत्वाचे
१४ नोव्हेंबर रोजी ''बाल दिन'' मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुले ही देशाचे भविष्य असतात व हेच भविष्य उज्वल होण्यासाठी सामाजिक व कौटुंबिक पातळयांवर जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. मुलांचे शैक्षणिक करीअर घडवण्याबरोबरच त्यांचे आरोग्य अबाधित राखणे हीदेखील अत्यंत महत्वाची बाब आहे. लहान मुलांचे आरोग्य हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळयाचा व संवेदनशिल विषय आहे. मुलांचे आरोग्य सुदृढ राखणे ही पालकांची मोठी जबाबदारी असते. आजकाल मुलांची दिनचर्यादेखील खूप व्यस्त झालेली आहे. शाळा, अभ्यास, क्लासेस, निरनिराळया अॅक्टीव्हीटीज यामध्ये मुलांचा दिवस कसा जातो तेच कळत नाही. या सर्व व्यस्त दिनचर्येत मुलांची शारीरीक हालचाल निट होत नाही. त्यांच्या शरीरास हवा तेवढा व्यायाम मिळत नाही. आजकालच्या मुलांची बौध्दीक क्षमता जरी चांगली असली तरी त्यांची शारीरीक शक्ती हवी तेवढी मजबूत राहत नाही. वातावरण बदललं व थोडी दगदग झाली की मुलांचं आजारी पडणं, व्हायरल इन्फेक्शन या गोष्टी सामान्य झालेल्या आहेत. बिझी शेडयुलमुळे मनसोक्त बागडणं नाही, खेळणं नाही, केवळ स्पर्धांच्या मागे धावणं, फक्त अभ्यास, मार्क्स व टॉपर होण्यासाठी आज मुलं धडपडत असतात. त्यांचेसाठी पालकदेखील अनावश्यक आटापिटा करताना दिसतात. यामुळे ब-याच मुलांमध्ये मुलांमध्ये शारीरीक व मानसिक ताण जाणवून येतो. काही मुलांमध्ये कॅल्शीअम कमी तर कोणाला व्हिटॅमिन ची कमतरता दिसुन येते. चालण्याची सवय तर मुलांधुन लुप्तच होत चाललेली आहे. कारण आज अनेक सोयी सुविधा त्यांना उपलब्ध झालेल्या आहेत. मुलांना कुठे चालत न्यायचे म्हटले की त्यांची टाळाटाळ सुरु होते मात्र तेच गाडी असली लगेच तयार. हा बदल आरामदायी जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आहे. लहान मुलांमध्ये आजार अचानकपणे उद्भवतात तसेच ते चटकन् गंभीर रूप धारण करू शकतात. कोणत्याही जंतूंनी होणाऱ्या आजाराची लहान मुलं आणि म्हातारी माणसं अशी दोन सहज सापडणारी भक्ष्यं असतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे लहान मुलांची काळजी अधीक प्रकर्षाने घेतली गेली पाहिजे. लहान मुलं आजारी पडल्यानंतर त्यांची देखभाल करणं पूर्ण कुटुंबासाठी खूप जिकिरीचं होऊन जातं. दुसरं म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती घाबरलीय, रडतेय असं दृष्य आजारी मुलानं पाहिलं तर त्याचाही उरला सुरला धीर खचतो अन् तो आणखीनच असहाय्य होतो. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी अशा वेळी धीर, संयम ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. त्याचा त्यांच्या लवकर बरं होण्यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून स्वत: खचून न जाता मुलालाही सतत धीर देण्याचाच प्रयत्न करावा. त्यामुळं मुलाला खूप सुरक्षित वाटतं. मुलांना वेळच्या वेळी सगळ्या लसी देणे फार महत्वाचं व आवश्यक आहे. मात्र सगळेच आजार लसी देऊ टाळता येत नाहीत हेदेखील खरं आहे. काही गंभीर आजारांवर लसी मिळतात. त्याच मोजक्या लसी आपल्या मुलांना दिल्या जातात. शासकीय पातळीवरून नियमितपणे द्याव्या लागणाऱ्या लसी सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध असतात. त्याची माहीती घ्यावी व त्याप्रमाणे लसीकरण करावे. आपण इतक्या लसी दिल्या तरी मूल आजारी कसं पडतं, अशी शंका घेणं बरोबर नाही. दुसरं म्हणजे सगळेच आजार गंभीर नसतात. आणि अशा छोटया मोठया आजारांमुळं त्यांची प्रतिकारशक्ती आणि सहनशक्ती वाढीला लागते. अशा सर्व आजारामध्ये मुलाच्या तब्येतीवर आणि आजाराविरूध्द प्रतिकार करण्याची त्याची कुवत यावर नजर ठेवत त्याला आराम कसा वाटेल याकडं लक्ष पुरवलं पाहिजे. काही आजारात मुलाला जंतूंविरूध्द लढाई द्यायची असते. त्यासाठी लागणारी शरीराची क्षमता योग्य असावी लागते. यासाठी प्रामुख्यानं पाण्याची अन् साखरेची जरूरी असते. साखर व पाणी कमी पडू लागलं की सर्वच अवयव व संस्था यांचा प्रतिकार कमी पडून जंतूंना वरचढ होण्याची संधी मिळते. म्हणून आजारी मुलाला भरपूर पाणी व ग्लुकोज (साखर) देत रहावं. आजारात भूक व पचनशक्ती मंदावल्यामुळं मूल कमी खातं. पण द्रव पदार्थ तरी भरपूर प्रमाणात साधारणतः लघवी होईल इतके द्रवपदार्थ तोंडानं सतत द्यायला हवेत. उलटया होत असतील तर मात्र डॉक्टरी सल्ला ताबडतोब घ्यावा. भरपूर द्रव पदार्थ म्हणजे ग्लुकोज पाणी, लिंबू सरबत, फळांचे रस, नारळ पाणी, साधं पाणी, ताक इत्यादी देता येतील. कुठूनतरी द्रव पदार्थ पोटात जाणं महत्वाचं असतं. त्यामुळं सलाईन, ग्लुकोज शिरेतून देणं असे पर्याय टळू शकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहिले तर आजार प्रतिकारक शक्ती वाढीस लागते. मऊ वरण भात, मुगाची खिचडी, साबुदाणा खीर इ. पदार्थ आवडी प्रमाणे अन् मागेल तितकेच द्यावेत. आजारात अन्न पचवण्याची क्षमता तात्पुरती मंदावत असते. त्यामुळं सक्तीनं दिलेल्या अन्नाचा फारसा उपयोग नसतो. भूक लागत असली तर मात्र हे पदार्थ भरपूर द्यावेत. भुकेच्या औषधाशिवाय, टॉनिकशिवाय लागणारी भूकच मुलाला परत मूळपदी आणून वजन वाढण्यास मदत करते. आजारात दिलेली टॉनिकं, भुकेची औषधं यांचा काहीच उपयोग नसतो. अशा औषधांसाठी डॉक्टरांकडे आग्रह धरू नये. आजारी बाळाची स्वच्छता फार महत्वाची असते. बाळाला जुलाब उलटया होत असतील तर हे फारच कटाक्षानं लक्षात घ्यायला हवं. त्याचे कपडे वेगळे ठेवून, स्वच्छ धुऊन, वाळवून वापरावेत. खाण्याच्या गोष्टी हाताळतांना हात स्वच्छ धुण्याचं विसरू नये. बाळाच्या शरीराची कोणताही जंतू, माशा यांपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. यासाठी शरीर व आसपास स्वच्छता राखायला हवी. आजारात नेसायला सोपे, मऊ, स्वच्छ, सुती कपडे घालावेत. ताप असतांना बाळाला अंगात कमीत कमी कपडे हवेत. म्हणजे ताप उतरायला मदत होते. तापात अंगात स्वटेर्स, टोपडी इ. जादा कपडे घातल्यानं मूल उबतं आणि ताप वाढल्यानं चिडचिड होत. बाळाला आजारात औषधं आणून देणं ही जरी आपल्या समाधानाची बाब असली तरी फार औषधं देणंही बरं नाही. औषधांचे दुष्परिणाम जर परिणामांपेक्षा जाचक होणार असतील तर ती टाळलेलीच बरी. मात्र त्रास जास्त होतोय असं दिसताच औषधं जरूर देऊन बाळाला आराम द्यावा. बऱ्याचदा औषधांचा आणि त्यावेळेचा कटु अनुभव मुलं विसरत नाहीत आणि मग औषधं पाजणं आणखीच अवघड होतं. त्यामुळे मुलाचा मूड व त्याची स्थिती पाहून औषधे द्यावीत. आजारपणात आई वडिलांची गरज प्रकर्षाने मुलाला जाणवते. अशा वेळी त्यांनी मुलासाठी वेळ देणे अग्रक्रमाचे असते. आजकाल नोकऱ्या करणाऱ्या आई वडिलांना मुलांच्या आजारासाठी वेगळ्या रजा मिळत नाहीत. पण याच काळात मुलाला त्यांची फारच जरूरी असल्यानं त्यासाठी रजा काढण्याचा प्रयत्न करावा. अगदी बिनपगारी असली तरी. मुलांच्या आजारात पालकांच्या रजेसंबंधीच्या प्रश्नांवर विचार होणं आवश्य आहे. परदेशात मुलांच्या आजारासाठी पालकांना पगारी रजा सुध्दा मिळतात. मुलं आजारी पडण्याची शक्यता आणि प्रमाण कमी असून सुध्दा या प्रश्नावर विचार होऊन त्यावरच तोडगा अंमलात आला आहे. कौटुंबिक जवळीक, आराम, वेळच्या वेळी औषधोपचार व पालकांचा मानसिक संयम या गोष्टी मुलांच्या आजारपणात सकारात्मक परिणाम करतात. मुलांचे आरोग्य कोणत्याही घरात प्रधान्याचा विषय असतो. त्यामुळे घरातील मूल आजारी पडले की कुटुंबाची मानसिक स्थिती खालावते. अशा वेळी धीर ठेवून सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण व्हायला हवी. मुलाला अन्न व औषधे वेळच्या वेळी दिली तर या परिस्थितीतून लवकर बाहेर पडण्यास मदतच होते. मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे यासाठीच आजचे आरोग्यमंथन.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment