नव्याने निवडणुका राज्याला परवडणाऱ्या नाहीत



महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत दयनीय आहे. संमिश्र कौल देऊन जनतेने विरोधी पक्ष मजबूत केला खरा पण सध्या सत्तेच्या सुंदोपसुंदित कुणीही दुसऱ्यासोबत एकत्र येऊन सरकार बनवण्यास तयार नाही. आज राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. सरकार बनेल व लवकर नुकसान भरपाईचा निर्णय घेईल या आशेत बसलेल्या शेतकऱ्यांचीही घोर निराशा झाली व अखेर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गुरुवारी थेट राजभावनावर धडक दिली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानन्तर येत्या सहा महिन्यांत कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाऊ लागू शकते जे अजिबात परवडणारे नाही. दुसऱ्यांदा निवडणुका प्रस्थापित उमेदवारांना जड जातीलच पण जनतेच्या कररूपी पैशाचा चुरडादेखील करणाऱ्या ठरतील. गेले दोन तीन महिने निवडणूकांमुळे अगोदरच विकास कामांशीवाय वाया गेलेले आहेत. पुन्हा निवडणुका झाल्यास त्याचा विपरीत परिणाम राज्यातील विकासकामांवर होईलच पण त्याची मोठी किंमत प्रस्थापित राजकीय पक्षांना चुकवावी लागेल. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा राजकीय पक्षांनी लवकरात लवकर आपसात मिटवावा व विकासकामांना वाट मोकळी करून द्यावी. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त