विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम 2.0
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
विशेष लसीकरण मोहिम २.०
लहान मुले आणि गरोदर मातांचे आरोग्य राखण्यासाठी विविध उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्या दृष्टीने लसीकरण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आरोग्य विभागाकडून क्षयरोग, काविळ-ब, पोलिओ, गोवर- रूबेला, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आदी आजारांच्या प्रतिबंधासाठी नियमित लसीकरण करण्यात येते. तथापि, काही कारणांमुळे लसीकरण न होऊ शकलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या गरोदर माता व बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेचा पहिला टप्पा डिसेंबर महिन्यात होत असुन दुसरा टप्पा जानेवारीत, तिसरा टप्पा फेब्रुवारी व चौथा टप्पा मार्चमध्ये राबविण्यात येणार आहे. ही मोहिम चार टप्प्यांत राबविण्यात येणार असल्याने लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही अशी खात्री आरोग्य विभागाला आहे. अशा प्रकारची मोहिम यापुर्वीदेखील केंद्र शासनामार्फत राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून त्यांचे लसीकरण केले जाते.
बालकांमधील आजारपण व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत उपयुक्त व प्रभावी साधन आहे. केंद्र शासनाने वर्ष 2020 पर्यंत पूर्णतः लसीकरण 90 टक्क्यापर्यंत करण्याचे ध्येय ठेवले आहे. मिशन इंद्रधनुष मोहिमेमुळे राज्यातील जिल्हे व महानगरपालिकांमध्ये पूर्ण लसीकरणाचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसुन येत आहे. केंद्र शासनाने सध्या विशेष मिशन इंद्रधनुष मोहिम राबवण्याचे कळविले असुन या मोहिमेत महाराष्ट्रातील 25 जिल्हे व 20 महानगरपालिका निवडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, वर्धा, वाशीम, नाशिक आणि ठाणे या जिल्हयांचा तसेच अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, चंद्रपूर , जळगाव, लातूर, परभणी, वसई विरार, पनवेल, सोलापूर, नाशिक, मालेगाव, ठाणे, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिकांचा समावेश आहे. ० ते २ वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थी व गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणा-या सर्व लसींव्दारे लसीकरण करणे, लसीकरणापासुन वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणे, लसीकरणास नकार देणा-या कुटुंबातील व समाजातील बालकांचे लसीकरण करणे, शासनाच्या विविध मंत्रालयीन विभागांत समन्वय साधुन प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी निश्चित करुन प्रत्येक लाभार्थ्याचे पूर्ण लसीकरण करणे ही प्रमुख उदिदष्टे विशेष लसीकरण मोहिम २.० या कार्यक्रमाची आहेत. पहिला टप्पा 2 डिसेंबरपासुन सुरु झालेला असुन दुसरा टप्पा 6 जानेवारी 2020, तिसरा टप्पा 3 फेब्रुवारी व चौथा टप्पा 2 मार्च 2020 पासुन राबविण्यात येणार आहे. ही मोहीम शासकीय सुटटी, रविवार आणि नियमित लसीकरणाचे दिवस वगळुन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरीता लसीकरणापासुन सुटण्याची शक्यता असलेल्या जोखीमग्रस्त भागाची निवड करण्यात आली आहे. तसेच लाभार्थ्याांचे उदिदष्ट तालुकानिहाय निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेधील सत्रे तीन प्रकारे घेण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय इत्यादी आरोग्य संस्थांमध्ये सत्र, बाहय सत्रांमध्ये अंगणवाडी, शाळा, पंचायत घर आदी ठिकाणी तसेच मोबाईल सत्रामध्ये डोंगराळ भागातील वस्त्या, पाडे, ऊस तोड कामगार वस्त्या अशा विखुरलेल्या लोकसंख्येचे क्षेत्र घेण्यात येत आहे. लसीकरण करणा-या चमुमध्ये एक आरोग्य सेविका व दोन मोबिलायजर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सत्राची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 अशी असुन लाभार्थी उपलब्धततेनुसार ही वेळ बदलली जाते. या मोहिमेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, आदिवासी विभाग, नगरविकास विभाग, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग, ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, आरोग्य सेवा संचालनालय या मंत्रालयीन विभागांमध्ये तसेच जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, स्वयंसेवी संस्था, एनएसएस, एनसीसी यासारख्या संस्थांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे. राज्यातील कुठलाही बालक वा गरोदर माता आरोग्यासाठी महत्वपूर्ण असणा-या लसीकरणापासुन वंचित राहु नये यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशिल असुन त्याचा चांगला परिणाम समाजात दिसुन येत आहे. अर्भक मृत्यू व माता मृत्यूंची कमी झालेली आकडेवारी हे याच प्रयत्नांचे फलित आहे. लसीकरणाचे महत्व आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी अनन्यसाधारण असुन या लसी वेळच्या वेळी घ्याव्या यासाठीच आजचे आरोग्यमंथन.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment