नियमांमध्ये पारदर्शकता हवी


अनियमित सार्वजनिक वाहतुकिला पर्याय म्हणून मुंबई शहरात खाजगी ट्रॅव्हल्स बसचे पेव फुटले आहे. प्रवाश्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मनमानी भाडे आकारणे, हव्या तिथे बसेस उभ्या करणे, वाहतूक व पार्किंग नियमांचा भंग करणे हे या ट्रॅव्हलर्स साठी नित्याचेच झाले आहे. याबाबतीत कठोर नियम असतानादेखील सर्रास सुरू असलेले असे प्रकार वाहतूक पोलिसांचे अभय असल्याशिवाय घडू शकत नाहीत. वाहतूक पोलिसांच्या संशयास्पद कामकाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अंमलात आणायला हवी. यासाठी विशेष तपासणी पथके स्थापन केल्यास सत्य समोर येईल. नियम बनवणे सोपे आहे मात्र ते राबवण्यासाठी मानसिकतेत बदल घडायला हवा. नियमांमध्ये परदर्शकता हवी. 


वैभव मोहन पाटील  
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त