माध्यमे जबाबदार
नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीविरोधात देशातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विद्यार्थी दशेतील तरुण ज्यावेळी एखादे आंदोलन छेडतात त्यावेळी राजकीय हस्तक्षेपापलीकडे जाऊन तो वैचारिक विरोध असतो. शिक्षण, नागरिकत्व, देशभक्ती यांचेवर प्रहार करणाऱ्या घटनाबाह्य तरतुदींना विरोध करण्यासाठी तरुण पुढाकार घेत असतील तर ते चांगले संकेत आहेत मात्र आंदोलन हे लोकशाही मार्गाने व्हायला हवे. लोकशाहीमध्ये नानाविध प्रकारे आंदोलने करण्याची मुभा दिलेली असताना हिंसकतेकडे झुकणारे आंदोलन समर्थनिय अजिबात नाही. तरुणांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल अशा रीतीने आपला विरोध प्रकट न करता अहिंसेच्या मार्गाने निषेध नोंदवला तरी त्याची दखल माध्यमांनी घ्यायला हवी. तोडफोड, जाळपोळ यांशिवाय आंदोलनाला धार मिळत नाही हा समज गेल्या काही वर्षांत समाजात व विशेषतः तरुणाईत दृढ होत चालल्यामुळे आंदोलने अधिक हिंसक होऊ पाहत आहेत. याला कारणीभूत ठरणाऱ्या प्रसार माध्यमांनी याची दखल गांभीर्याने घ्यायला हवी.

Comments
Post a Comment