असा किर्ती कुमार न होणे
असा 'कीर्ती' कुमार न होणे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी निघालो तोच एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गावाकडची बातमी कानावर आली. ज्याला त्याच्या लहानपणापासून सोबतीने मोठे होताना पाहत आलो तो माझा चुलतबंधू किर्ती यशवंत भोईर याचे अकाली निधन झाल्याचा तो निरोप होता. गेले कित्येक महिने आजारपणाशी संघर्ष करणाऱ्या किर्तीने अखेर सर्वांचा निरोप घेतला. अवघ्या पस्तीशीतील किर्तीने अगदीच कमी मात्र सर्वांनाच हेवा वाटावा असे आयुष्य जगले. आज जीवाला जीव लावणारा कुटुंबकबिला आणि पुढ्यात असणारे सुंदर आयुष्य हे सारे अर्धवट सोडून जाणाऱ्या कीर्तीच्या अंतिम यात्रेत धाय मोकलून रडणारी त्याची आई (काकू) आणि कधी न रडणारे मात्र आज आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारे त्याचे वडील (यशवंत काका) पाहून मन अत्यंत गहिवरून आले. त्याला आजारातून बरे करण्यासाठी ह्या कुटुंबाने विशेषतः धाकट्या संतोष काकाने अगदी जीवाचे रान केले. जिथे मार्ग सापडेल तिथे त्याच्या उपचारासाठी धाव घेताना मी त्यांना पाहिलंय. मात्र काही घटना ह्या विधिलिखित असतात आणि त्या चुकवता येत नाहीत असे आमचे बाबा म्हणायचे. त्...


Comments
Post a Comment