प्रवाशी कट्टा दैनिक लोकमत



आजकाल लोकल ट्रेन चा प्रवास म्हटला कि धडकी भरते. प्रत्येक स्टेशन वरील ओसंडून वाहणारी गर्दी, लोकलमधील गर्दी, चढताना असो वा उतरताना, सगळीकडे असणाऱ्या गर्दीच गर्दीने अगदी गुदमरायला होते. घणसोलीवरून नित्यनेमाने गेली दहा ते बारा वर्षे मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना कधी नव्हे इतका गर्दीने उच्चांक गाठलाय असे वाटायला लागते. दररोज प्रथम वाशी ठाणे या ट्रांसहार्बर व नंतर ठाण्यावरून सि एस टी कडे मध्य रेलवेचा प्रवास करताना उलट दिशेकडून येणाऱ्या गाड्या मात्र कमालीच्या रिकाम्या धावत असल्याचे निदर्शनास पडते. व यातूनच या भरून वाहणाऱ्या गर्दीवरील पर्याय देखील सापडतो. मुंबई शहरामध्ये विशेषतः फोर्ट, कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉईंट पासून अंधेरी पर्यंत असणारी मोठमोठया कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये, बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालये यांकडे हि गर्दी रोज पोटापाण्यासाठी धाव घेत असते. जर यातील काही कार्यालये उपनगरांमध्ये स्थलांतरित केली तरी या गर्दीवर सोयीस्करपणे मार्ग काढता येऊ शकतो. या गर्दीचा प्रवासच फिरवता येऊ शकतो. यामुळे एकतर गर्दीचा समतोल साधता येईल व दुसरे म्हणजे दररोज रेल्वे प्रवासात जाणारे बळी व लूटमारी थोपवता येईल. तरी या स्थलांतरासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या सर्व यंत्रणांनी सहकार्याने, सामोपचाराने व लाखो प्रवाशांचे हित लक्षात घेऊन यावर तोडगा काढावा हि अपेक्षा. 







वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त