कारशेडसाठी वृक्षतोड अयोग्य


मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध केलेला होता. मात्र सत्ताधारी पक्षात असूनदेखील हे काम थांबवणे सेनेला शक्य झाले नाही. यासंदर्भात न्यायालयानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता नवे सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामास स्थगिती देण्याचा घेतलेला निर्णय अपेक्षितच होता. मूळ मुद्दा येथील कारशेडच्या कामासाठी होत असलेली वृक्षतोड हाच आहे. आणि वृक्षतोडीशिवाय येथे कुठलाही कारशेड उभा राहणे शक्य नाही. त्यामुळे मेट्रोच्या कारशेडचा सुरू झालेला हा प्रकल्प मोठ्या पेचात सापडणार आहे. राजकीय पक्ष व पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून कारशेडचे काम सुरू करणे जमणार नसून प्रकल्पास विरोध करणारे पक्ष आता सत्तेत बसल्यामुळे कारशेडचा मार्ग खडतर झाला आहे. मुळात वादग्रस्त जागेवर कारशेडचा घाट घालनेच संयुक्तिक नव्हते. मुंबईतून नष्ट होत चाललेली वृक्षसंपदा व जंगले वाचवण्यासाठी सुरू झालेल्या या लढाईचा अंतिम परिणाम काय निघतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त