अडवली भुतावली शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची 190 वी जयंती साजरी


अडवली भुतावली शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची 190 वी जयंती साजरी
नवी मुंबई मनपा शाळा क्र ४१, अडवली भुतावली शाळेत दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी बालिकादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेत बालिकादिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांची 190 वी जयंतीदेखील विद्यार्थिनींच्या विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री सावंत सर आणि नगरसेवक श्री रमेश डोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मोहन डोळे आणि सर्व शिक्षक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मुला मुलींनी सावित्री बाई आणि ज्योतिबा फुले यांचा पेहराव केला होता, तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर केले.  यावेळी शाळेने सावित्री बाई फुले यांची प्रतिमा, विविध ग्रंथ यांच्या पालखीची संपूर्ण गावात लेझीम ढोल ताश्यासह भव्य मिरवणूक घोषणा देत काढली. त्यात ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी रिंगण घालून लेझीम प्रात्यक्षिक मुलांनी सादर केली. पालखी सोहळ्यातील सावित्रीबाई फुले, ज्योतीराव फुले यांचे पेहराव घातलेले विद्यार्थी आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. अडवली भुतावली शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, शिक्षक वृंद श्री पारधी , श्री भोये , श्री रोठे  , श्री रविकांत , सौ विद्या पाटील , सौ सरणींगे  , सौ भोईर , सौ सपना पाटील  , निर्मिती घोडविंदे , श्री भोईर , राहुल , श्री रवी   , श्री गवते , श्री भास्कर , सुनंदा मावशी, अरुणा मावशी तसेच लर्निंग लिंक फाऊंडेशन चे प्रयोगशाळा मार्गदर्शक श्री विक्रांत माहुलकर या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 











वैभव पाटील, घणसोली

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त