निर्णय प्रवाशी हिताचा असावा


काही मार्गिकांवर खाजगी मालकीतून रेल्वेसेवा चालवण्याच्या धोरणाला रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली आहे. आज रेल्वेतील सोयीसुविधांबाबत प्रवाशी पूर्णतः समाधानी नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेल्वेचे खाजगीकरण करणे प्रवाशांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. खाजगी संस्थांमार्फत सेवा पुरवली जाणार असल्यामुळे सुविधा पुरवण्यासाठी रेल्वेबरोबर एक प्रकारची स्पर्धा निर्माण होईल व त्याचा फायदा प्रवाशांना मिळेल. या खाजगी रेल्वे सेवेवर पूर्ण नियंत्रण खाजगी चालकांचे राहणार असले तरी त्याच्या तिकीटदरांवर नियंत्रण मात्र सरकारचे राहणे अत्यंत गरजेचे आहे. रेल्वेप्रवास करणारे बहुतांश प्रवाशी सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यामुळे खाजगी चालकांमार्फत त्यांची लूट होता कामा नये. चांगल्या व किफायतशीर सुविधा व वक्तशीरपणा रेल्वेमध्ये येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये रेल्वे असफल ठरताना दिसत असल्याने काही मार्गांचे खाजगीकरण हा यावर एक चांगला तोडगा असला तरी या खाजगी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक पीळवणूक व्हायला नको. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त