नवी मुंबई वॉकेथॉन
रविवारी १९ जानेवारीला एकीकडे मुंबईत "मुंबई मॅरेथॉन" रंगली होती तर दुसरीकडे नवी मुंबईत एमजीएम हॉस्पिटलच्या वतीने "निरोगी आयुष्याचे" स्लोगन घेऊन सलग ७व्या वर्षी नवी मुंबईकरांसाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून वाशी येथील सेक्रेड हार्ट शाळेसमोरील मैदानातून सुरू झालेल्या ह्या वॉकेथॉनमध्ये हजारो नवी मुंबईकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एमजीएम हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी चौक, वाशी डेपो, मरीआई मंदिर ते परत सेक्रेड हार्ट ग्राऊंड या मार्गावर वॉकेथॉन चालवण्यात आली. सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आजच्या धकाधकीच्या जीवनात किती महत्वाचा आहे हे या वॉकेथॉन मधील नवी मुंबईकरांच्या उपस्थितीने दाखवून दिले. जेष्ठ नागरिक संघ व अनेक स्वयंसेवी संस्थानीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज बैठ्या कामामुळे व आरामदायक जीवनशैलीमुळे मणके, सांधे, पाठदुखीच्या असंख्य व्याधी उद्भवत आहेत. त्यावर चालणे हा उत्तम इलाज आहे. दररोज चालण्याचा व्यायाम आपल्याला फिट ठेवण्यास कारणीभूत घटक ठरू शकतो. त्यामुळे एमजीएम हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा वॉकेथॉनचा उपक्रम नवी मुंबईकरांसाठी आरोग्याचा उत्तम संदेश देणारा आहे एव्हढे नक्की.
वैभव




















Comments
Post a Comment