किंमती स्थिर ठेवा


सलग पाचव्या महिन्यात गॅस सीलेंडरच्या किंमती वाढल्याने त्याचा मोठा आर्थिक भार सर्वसामान्यांच्या बजेटवर पडणार आहे. डिसेंबर महिन्यात कांदा व इतर भाज्यांच्या दरात झालेली दरवाढ अजून कमी होण्याची चिन्हे नसतानाच गॅस सिलेंडरच्या दरातही वाढही झाल्याने खाणेही महागले अन शिजवणेही अशी अवस्था आहे. वास्तविकता वाढती महागाई नियंत्रणात ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. महागाईच्या काळात सरकारी कर व खर्च काही अंशी कमी केल्यास वस्तूंच्या किंमती स्थिर राहतील. विविध जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत सरकारी हस्तक्षेप गरजेचा असून त्या वस्तूंचे बाजारभाव थेट सरकारी नियंत्रणाखाली आणणे आवश्यक आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या उत्पादनांचे दर आंतराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात हेदेखील खरे असले तरी लोकांच्या दैनंदिन वापराच्या गॅस सिलेंडरच्या बाबतीत दर स्थिर ठेवण्याची जबाबदारी सरकारने उचलायलाच हवी असे वाटते. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त