रिक्षा टॅक्सी वर दिव्यांचा निर्णय प्रवासी हिताचा


मुंबई शहरात हजारो टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत. मुंबईत प्रवास करताना टॅक्सी नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावते. मात्र अनेक प्रवाशांचे ह्या टॅक्सी सेवेबद्दल फार चांगले मत व अनुभव नाहीत हेही तितकेच खरे आहे. प्रवाशांना टॅक्सीला हात करुन टॅक्सी थांबवावी लागते. अनेकदा टॅक्सी रिकामी नसेल तरी लोक हात दाखवत टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर कधी टॅक्सी रिकामी असेल तरी टॅक्सी चालक आपल्याला घेऊन जाण्यास तयार होत नाही तर कधी रिकामी टॅक्सी न थांबता सुसाट निघून जाते. त्यामुळे प्रवाशांचे टॅक्सी चालकांशी नेहमीच वाद होतात. मात्र परिवहन विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सींवर तीन रंगाचे दिवे लावण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशी हिताचाच आहे. यामुळे टॅक्सी आपल्यासाठी उपलब्ध आहे की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. टॅक्सी युनियनने या निर्णयास विरोध दर्शविला असला तरी प्रवाशांच्या दृष्टीने ह्या लाभकारी निर्णयाचे दूरगामी परिणाम सर्वांच्याच हिताचे व शिस्तीचे ठरतील एव्हढे नक्की.  


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा