जलद व कठोर निकाल आवश्यक
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. यातील गुन्हेगारांना कधी कडक शिक्षा मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या प्रकरणातील चारही आरोपींना १ फेब्रुवारी ला फाशीची शिक्षा देण्याचा आलेला निकाल स्वागतार्ह असून अशा घटनांतील इतर दोषींसाठीदेखील धोक्याची घटना वाजवणारा आहे. खरेतर हा खूपच उशिरा आलेला निर्णय आहे. याने निर्भयाचा गेलेला जीव परत मिळणार नसला तरी तिच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने या निर्णयातून न्याय मिळाला असेच म्हणावे लागेल. बलात्कारातील गुन्ह्यांमध्ये गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तातडीने फाशीचीच शिक्षा कायम करायला हवी जेणेकरून कायद्यातील पळवाटांचा आधार आरोपींना मिळणार नाही. कठोर शिक्षाच असे गुन्हे रोखण्यासाठी जालीम इलाज आहे. निर्भया प्रकरणानंतरदेखील अत्याचाराच्या अनेक घटना देशात घडत आहेत. कायद्याचा धाक समाजात राहिला नसल्याचा हा परिणाम असून गुन्हेगारांना विकृतीपुढे कुठलेही भय राहिले नसल्याचे द्योतक आहे. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी जलद व कठोर निकालच पर्याय ठरू शकतील.

Comments
Post a Comment