संग्रहालये जोपासा
विविध प्रकारच्या पौराणिक व ऐतिहासिक वास्तूंची संग्रहालये मुंबईसह देशभरात स्थापन करण्यात आलेली आहेत. मात्र त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. पुतळे, स्मारके उभारण्यासाठी जितका खर्च आज केला जातो त्याच्या काही टक्का खर्च ह्या संग्रहालयांवर केला तर भारतीय इतिहासाचा हा अमूल्य वारसा जोपासला जाईल. आज अनेक परदेशी नागरिक इथे येवुन संग्रहालयातील वास्तुंचा व त्यामागील ऐतिहासिक पात्रांचा अभ्यास करण्यात जो रस दाखवतात तितकी रुची आजकाल आपल्या शालेय विद्यार्थ्यांमध्येदेखील निर्माण होण्यासाठी प्रयत्न होत नाहीत याबद्दल खेद वाटतो. आधुनिक पिढी ही डिजिटल क्रांतीच्या युगात वावरत असून त्यांना सर्व प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असली तरी ऐतिहासिक गोष्टींचा वारसा जोपासणारी संग्रहालये ही त्या माहितीचे प्रत्यक्ष पुरावे आहेत. त्यामुळे भावी पिढीला मार्गदर्शक ठरणारे हे संदर्भ जोपासलेच पाहिजेत.

Comments
Post a Comment