निसर्गराजा एक सांगते





निसर्ग राजा ऐक सांगते गुपीत जपलं रे 
मेघांनो, वृक्षांनो
वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो
तेरी भी चूप, मेरी भी चूप
कोणाला काही सांगू नका, कबूल
निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
तो दिसला अन्‌ मी पाहिले
पाहिले परि ते कुर्ऱ्याने
डोळ्यांत इशारे हसले
हसले ते मोठ्या तोर्‍याने
हे कसे न त्याला कळले
कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले, शब्द न जुळले, थोडे चुकले रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
का चाललात ?
तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना ...... का ?
वा छान दिसतंय ..... काय ?
हे रूप भिजलेलं .... आणि ते पहा ...... काय ?
तुमचं मनही भिजलेलं ...... कशानं ?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
निसर्गराजा ऐक सांगतो गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय रे
तो भाव प्रीतिचा दिसला
दिसला मग संशय कसला ?
हा नखरा का मग असला ?
असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला ?
कसला तो प्रियकर भोळा
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडलंय रे
लहानपणापासून ऐकत आलेल्या ह्या गाण्याचे शब्द, स्वर आजही मनाला सुखद गारवा देतात. लहानपणी रेडिओवर हे गाणे लागले की सभोवतालचा निसर्ग पाहून या गाण्यात वावरत असल्याचा भास व्हायचा. कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी दरवेळेस नवाच शृंगार या गाण्यातून जाणवतो. मनात लपलेली गुपिते सांगण्यासाठी थेट निसर्गराजालाच साद घालणारे हे गीत एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे आहे. पॉप, हॉप, रिमिक्स गीतांमध्ये रमलेल्या आजच्या पिढीला ह्या गीताचे बोल परके वाटतील मात्र ८० ते ९० च्या दशकातील पिढीला या गीताने अक्षरशः वेड लावले होते. गीत ऐकताना दुर्मिळ होत चाललेल्या गर्द निसर्गाच्या सानिध्यात आपण वावरत असल्याचा भास होतो. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या झुंज या चित्रपटातील हे गीत उषा मंगेशकर व चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेले आहे. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी हे गीत शब्दबद्ध केले असून संगीत राम कदम यांचे आहे. अगदी निर्मळ व प्रेमळ शब्दांची जुगलबंदी करून निर्माण झालेली ही अप्रतिम कलाकृती आजही अगदी ताजीतवानी वाटते.

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त