आरोग्यमंथन - राज्य आरोग्य माहिती शिक्षण व संपर्क विभाग

राज्य आरोग्य माहिती शिक्षण व संपर्क विभाग 

कोणत्‍याही कार्यक्रमाची किंवा योजनेची माहिती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्‍यासाठी संपर्क माध्‍यम उपलब्‍ध असणे आवश्‍यक असते. आज अशी अनेक माध्‍यमे आपल्‍यापुढे उपलब्‍ध आहेत. प्रिंट मिडीया, सोशल मिडीया, डिजीटल व न्‍यूज मिडीया यांचेमार्फत विविध कार्यक्रम, घटना, विचार पोहचवण्‍याचे काम केले जाते. शासनाच्‍यादेखील अनेक विभांगामध्‍ये अशा प्रकारचे जनसंपर्क विभाग कार्यान्वित आहेत. राज्‍याच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागामध्‍ये आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी कार्य अधिक प्रभावीपणे होण्‍यासाठी स्‍वतंत्र असा आरोग्‍य शिक्षण व संपर्क विभाग स्‍थापन करण्‍यात आला. सदयस्थितीत हा विभाग पुण्‍याच्‍या विश्रांतवाडी येथील आरोग्‍य भवन तथा परिवर्तन इमारत येथे कार्यान्वित आहे. या विभागाची तोंडओळख वाचकांना व्‍हावी हा उददेश या लेखाचा आहे.
आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी उपक्रमांचे योग्‍य प्राधान्‍यक्रमाने नियोजन करणे, आरोग्‍य खात्‍याअंतर्गत विविध विभागाकडून राबविण्‍यात येणा-या आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी उपक्रमांविषयी सहकार्य व समन्‍वय साधणे, राज्‍याचे आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी बाबत धोरण ठरवून अंमलबजावणी करणे, राज्‍याच्‍या आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी बाबत उपक्रमाचे नियोजन, संयोजन करणे व दि‍शा देणे, राज्‍यातील आरोग्‍य सेवेच्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये कार्य करणा-या कर्मचा-यांना आरोग्‍य शिक्षण देण्‍याच्‍या पध्‍दती व प्रसिध्‍दीबाबत सल्‍ला, तांत्रिक मदत व मार्गदर्शन करणे, राज्‍यातील आरोग्‍य सेवेमध्‍ये कार्यरत असणा-या कर्मचा-यांना आरोग्‍य शिक्षण देण्‍याच्‍या पध्‍दती बनवणे, प्रसिध्‍दीबाबत तंत्र आणि साहित्‍य निमिर्तीबाबत प्रशिक्षण् देणे, आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दी कार्याच्‍या अनुषंगाने शासनाचे विविध विभाग तसेच आरोग्‍य विभागा अंतर्गत सहकार्य व समन्‍वय निर्माण करणे, आरोग्‍य शिक्षण व प्रसिध्‍दीबाबतचे बाहयसंस्‍थाच्‍या मदतीने (जसे युएनएफपीए , युनीसेफ यासारख्‍या संस्‍था) साकारण्‍यात येणा-या उपक्रमांची अंमलबजावणी करणे ही मुख्‍य उदिदीष्‍टे या विभागासमोर आहेत. तसेच विविध राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमाअंतर्गत आरोग्‍य शिक्षण उपक्रमांचे नियोजन करणे, आरोग्‍य शिक्षणासाठी मुद्रित, दृकश्राव्‍य साधनांची निमिर्ती करुन कार्यक्षेत्रात पुरवठा करणे, राज्‍यामध्‍ये आरोग्‍य प्रदर्शनाचे आयोजन, महिला व युवकासांठी विविध आरोग्‍य शिक्षण मेळाव्‍यांचे आयोजन, महाराष्‍ट्र आरोग्‍य पञिका या मासिकाचे प्रकाशन, जिल्‍हास्‍तरावरील माहिती शिक्षण व संर्पक कार्यक्रमाचे सनियंञण, आरोग्‍य शिक्षण व जनजागरण मोहीमांचे व्‍यवस्‍थापन, राज्‍यातील आरोग्‍य शिक्षण प्रकल्‍प व कार्यक्रमाचा आढावा, जागतिक आरोग्‍य दिन, जागतिक लोकसंख्‍या दिन अशा विविध आरोग्‍य दिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरावर तसेच जिल्‍हयातील कार्यक्षेत्रात स्‍थानिक ग्रामपंचायत, स्‍वयं सेवी संस्‍थाच्‍या मदतीने आरोग्‍यशिक्षणाविषयी फिल्‍म शो या सारख्‍या उपक्रमाचे आयोजन करणे, विविध आरोग्‍य कार्यक्रमा विषयी माहिती देणारे टिव्‍ही स्‍पॉट, रेडिओ जिगंल, वृतपत्र् जाहीराती तयार करुन प्रसिध्‍दी करणे, डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्‍कार योजना अंमलबजावणी करणे हीदेखील उदिदष्‍टे व कर्तव्‍ये या विभागाची आहेत.
जनजागृतीसाठी आजवर व्‍यापक काम या विभागामार्फत करण्‍यात आलेले आहे. स्वाईनफ्ल्यू जनजागृतीसाठी घडिपत्रिका,स्टिकर्स,व्‍हीडीओ फिल्‍म,टिव्‍ही स्‍पॉट, पोस्‍टर्स, फोल्‍डर्स, होर्डींग, हॅंडबील, जन्‍मनोंदी, लसीकरण, स्‍तनपान, पोषण आहार, धुम्रपान व तंबाखुचे दुष्‍परिणाम आणि किटकजन्‍यरोग यांच्‍या घडीपत्रिका, आरोग्‍य पत्रिका मासिक, पी.व्‍ही.सी. स्टिकर्स व बॅनर्स, आरोग्‍य संदेशाविषयीचे पञाफलक, एड्स नियंञण माहिती पुस्‍तीका, फिलप बुक व फिलप चार्ट, पल्‍स पोलीओ, कुष्‍ठरोग, स्‍वाईन फलू, किटकजन्‍यरोग, आरसीएच कार्यक्रम,पोषण यावरील रेडिओ जिगंल्‍स. व मास्‍टर्स कॅसेटस, गुटका, तंबाखु, स्‍वाईन फलु, प्रजनन आरोग्‍य व बाल आरोग्‍य, सिकलसेल इत्‍यादी, आजारावरील माहितीचे टी.व्‍ही. स्‍पॉट निर्मिती, विविध आजारासंबंधी माहिती ऑडिओ व व्हिडिओ सी.डी., आरोग्‍य प्रदर्शनासाठी उपयुक्‍त डिस्‍प्‍ले, विविध आरोग्‍य संदेशाचे डिस्‍प्‍ले बोर्ड, व भित्‍ती पञके, विविध आरोग्‍य योजनावरील सनपॅक सीटस् पोटर्स् आणि फोल्‍डर्स. लॅमिनेशन पॅनल्‍स, 'परिवर्तन एक्‍सप्रेस' सारख्‍या फिरत्‍या वाहनाद्वारे आरोग्‍य उपक्रमाविषयी जनजागृती, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानाअंतर्गत विविध योजनाविषयी जनजागृती, टी.व्‍ही.स्‍पॉट व रेडिओ जिगंल निर्मिती, पी.सी.पी.एन. डी.टी. संबंधी 'मधुरा' हा माहितीपट, २७ विषयाचे प्रदर्शन फलक ५ विषयाचे प्रदर्शन कटआउटस्, स्‍थानिक भाषेत लोककला कार्यक्रम, प्रदर्शने, माहितीपट,आरोग्‍य मेळे, आंतरव्‍यक्‍ती संवाद मेळावे, मुदीत साहित्‍य निर्मिती इत्‍यादी आरोग्‍य शिक्षण व जनजागृतीचे साहित्‍य या विभागामार्फत उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहे. स्‍वाईनफल्‍यू विषयी जनजागृतीसाठी व्‍ही.डी.ओ. फिल्‍म, पोस्‍टर, घडीपञिका, स्टिकर्स् यांची निर्मिती व वितरण करण्‍यात आलेले आहे. गरोदरपणातील काळजी, जन्‍माची नोंद, लसीकरण, स्‍तनपान, आहार, गुटखा, तंबाखु, धुम्रपान, मधुमेह, जननी सुरक्षा योजना, स्‍वाईनफल्‍यू, सिकलसेल, हिवताप, डेंगी, चिकुनगुन्‍या इत्‍यादी विषयी घडीपत्रिका व फलीपबुक छपाई करुन वितरीत करण्‍यात आलेल्‍या आहेत. परिवर्तन एक्‍सप्रेस या दृकश्राव्‍य वाहनाच्‍या माध्‍यमातून यात्रा, महोत्‍सव व समारंभाच्‍यावेळी विशेष् जनजागृती करण्‍यात आली आहे. मुलींच्‍या विवाहाचे वय तसेच प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान याविषयी जनजागृती करण्‍यासाठी व्‍यापक प्रमाणात जनजागरण मोहिमांचे आयोजन करण्‍यात येत आहे. आरोग्‍य प्रदर्शनासाठी प्रसंगावर आधारित आकर्षक अशी मॉडेल्‍स तयार करुन घेण्‍यात आली. दूरदर्शनवर 'जागर' व 'अगबाई' या मालिका प्रसारित करण्‍यात आल्‍या. 'तुम्‍हीच सांगा देवा' ही कुटंब कल्‍याणवर आधारीत विशेष् गीतमाला व्हिडीओ फिल्‍म तयार करण्‍यात आली. रुग्‍णालयातील आरोग्‍य सुधारण्‍यासाठी 'मिस्‍ट्री पेशंट हंगामा' हा अभिनव उपक्रम महाराष्‍ट्र आरोग्‍य सेवा विकास प्रकल्‍पाअंतर्गत घेण्‍यात आला. अहमदनगर जिल्‍हयात डॉक्‍टर्स, नर्सेस व इतर कर्मचा-यासाठी सेवाभाव, सेवाप्रकल्‍प यासाठी तज्ञ संस्‍थेमार्फत प्रशिक्षण देण्‍यात आले. 'मेघदूत' पोस्‍ट कार्डच्‍या माध्‍यमातून मुलीच्‍या विवाहाचे वय या विषयी संदेश देण्‍यात आला. एस.टी बसेस,बेस्‍ट बसेस मुंबईतील लोकल रेल्‍वे यांच्‍या माध्‍यमातून पल्‍स पोलीओ संदेश, जननी सुरक्षा योजना,चिकूनगुन्‍या, डेंग्‍यू, मुलीच्‍या लग्‍नाचे वय इत्‍यादी विषयीचे आरोग्‍य संदेश रंगविण्‍यात आले. महाराष्‍ट्र राज्‍यातील जिल्‍हा मुख्‍यालयांना एल. सी.डी. प्रोजेक्‍टर पुरविण्‍यांत आले. जननी सुरक्षा योजना विषयी माहिती असलेले पेटेड साईन बोर्ड जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालये, जिल्‍हाअधिकारी, आरोग्‍य प्रशिक्षण केंद्र यांना पुरविण्‍यांत आले. आरोग्‍य विषयक माहिती असलेले स्‍क्रोलिंग बोर्ड जिल्‍हा मुख्‍यालये, जिल्‍हा सामानय रुग्‍णालये, जिल्‍हा आधिकारी, आरोग्‍य प्रशिक्षण केंद्र यांना पुरविण्‍यांत आले. आरोग्‍य विषयक माहिती असलेल्‍या होर्डिग्‍ज महत्‍वाच्‍या ठिकाणी उभारणी करण्‍यांत आली. लोकसंख्‍याविषयी फ्लिपचार्ट तयार करुन राज्‍यातील ग्रामपंचायती, माध्‍यमिक शाळांना पुरविण्‍यांत आले. आदिवासी क्षेत्रात लोककला कार्यक्रमाव्‍दारे जनजागरणासाठी विशेष अनुदान उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे.
राज्‍य आरोग्‍य माहिती शिक्षण व संपर्क विभागाच्‍या वतीने सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या विविध योजना व उपक्रम लोकांपर्यंत पोहचण्‍यासाठी सातत्‍याने प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. यासाठी फेसबुक, टिवटर, व्‍हाटसअप, इन्‍स्‍टाग्राम यासारख्‍या आधुनिक माध्‍यमांचा वापरदेखील विभागाच्‍या वतीने होऊ लागलेला आहे. राष्‍ट्रीय आजार नियंत्रण कार्यक्रमांच्‍या अंमलबजावणीमध्‍ये या माध्‍यमांचा वापर फार प्रभावी ठरत असुन लोकांमध्‍ये सरकारी आरोग्‍य सेवांबददलची विश्‍वासार्हता वाढीस लागलेली आहे. परिणामी मोठया प्रमााणावर लोक शासकीय आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये उपचार घेऊ लागलेले आहेत. आरोग्‍य विभागाच्‍या राज्‍य आरोग्‍य माहिती शिक्षण व संपर्क विभागामार्फत आरोग्‍य जनजागृतीसाठी करण्‍यात येणा-या प्रयत्‍नांची माहिती आपल्‍यापर्यंत पोहोचावी यासाठीच आजचे हे आरोग्‍यमंथन.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त